
धुमधडाका म्हणजे आनंदाचा उत्सव. ह्या उत्सवात सामील व्हा तुमच्या श्रवणयंत्रा सोबत !
दिवाळी हा असा एक सण आहे की नवीन वर्षाच calender आलं रे आलं की आपण पानं पटापट उलटून पहिल्यांदा हे बघतो की दिवाळी कोणत्या महिन्यात आणि तारखेला येते आहे. इतका आपल्या सगळ्यांना प्रिय असणारा हा सण!
दिवाळी म्हणजे खरेदी. नुसतं रस्त्यावर फिरून आलं तरी आजूबाजूच्या रंगांनी मन उल्हसीत होतं. लोकांच्या चेह-यावरचा आनंद, उत्साह, लगबग बघून आपण पण उत्साही होतो. खरेदी करताना तर जरूर श्रवणयंत्र वापरा. श्रवणयंत्रात गोंगाटाच्या वातावरणाकरीता विशिष्ट मेमरी असेल तर गोंगाट सुसह्य होण्याकरीता त्याचा वापर करा. एकदा बाहेर पडले की भेटीगाठी तर होणारच आणि संभाषण सुकर होण्यासाठी श्रवणयंत्र तर हवचं. गोंगाटासाठीची मेमरी वापरल्यास गोंगाट सुसह्य तर होतोच पण संवाद देखिल स्पष्ट ऐकू येतात.
तसे तर चिवडा, लाडू, चकली, अनारसे इ. आपण आजकाल वर्षभरच खातो पण हे पदार्थ जेव्हा दिवाळीत खातो तेव्हा त्याची चव काही तरी न्यारीच लागते. फराळाचे पदार्थ बनवणे हा सुद्धा एक सोहळाच असतो. त्याचा आनंद मनमुराद लुटा.
घर साफ करणे, घर सजवणे, कंदिल, रांगोळी, पणत्या, दिवे, किल्ला बनवणे किती म्हणून आनंदाचे क्षण असतात हया उत्सवाच्या काळात.
मुलांना त्यांच्या, प्रत्येक activity मध्ये श्रवणयंत्रांचा वापर करू दे. श्रवणयंत्र स्वच्छ राहतील ह्याची काळजी घ्या तसेच श्रवण यंत्र कोरडी राहतील ह्याची देखिल काळजी घ्या आणि त्याकरीता आठवणीने श्रवणयंत्र Dry kit box मध्ये ठेवा.
बरं आता श्रवणयंत्रातील वायरलेस तंत्रज्ञानामुळे गोंगाटात देखिल बोललेलं ऐकणं तस तर सुकर झालं आहे. तुमचा मोबाइल फोन आणि तुमचं श्रवणयंत्र जोडलं गेलं की संभाषण, आजूबाजूस असणा-या आवाजात सुद्धा फक्त ऐकूच येईल असं नाही तर समजेल देखिल.
वायरलेस तंत्रज्ञानामुळे अजून एक गोष्ट आता सुलभतेने करता येऊ शकते, ती म्हणजे इतरांना त्रास न होता तुम्हाला टिव्ही बघता येईल, ऐकता येईल. अर्थात त्याकरीता, एक छोटेसे उपकरण तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. हे उपकरण टिव्ही आणि तुमचे श्रवणयंत्र ह्यात एका सेतूचे काम करते, ते सुद्धा कोणत्याही वायरच्या बंधनांशिवाय. मग बघू शकाल तुम्ही तुमचा आवडता कार्यक्रम विनासायास आजूबाजूला असलेल्या आवाजात सुद्धा. दिवाळी पहाटेच्या सुश्राव्य संगीताचा आनंद पण श्रवणयंत्र असेल तर द्विगुणित होईलच.
दिवाळीच्या दरम्यानचं हवामान तर अत्यंत प्रसन्न आणि उत्साहवर्धक असतं. प्रवासासाठी अत्यंत अनूकूल. अल्हाददायक वातावरण, शाळा, कॉलेजच्या मुलांच्या सुट्ट्या म्हणजे बाहेरगावी जाणे आलेच.
प्रवासाला जाताना थोडक्यात पण महत्त्वाचे..
- तुमच्याजवळ पुरेसे बटन सेल्स असणं आवश्यक आहे तसेच यंत्र कोरडे ठेवण्यासाठीचा dry kit box जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे.
- दिवाळीच्या आधीच, श्रवणयंत्राचा मोल्ड साफ करून ठेवा नाहीतर मळाचा एक छोटासा कण सुद्धा श्रवणयंत्राचा आवाज बंद करू शकतो.
- तुमचे श्रवणयंत्र Rechrgeable असेल तर charge करण्यासाठी आवश्यक असणारी cable आहे ना ह्याची खात्री करून घ्या.
- काही श्रवणयंत्रांमध्ये power bank ची सुविधा असते पण जर तुमच्या श्रवणयंत्रात ती नसेल तर एखादी power bank तुमच्या जवळ ठेवलीत तर तुमचे श्रवणयंत्र तुम्हाला कुठेही charge करून लगेच वापरता येईल.
आता अत्यंत महत्त्वाची सूचना :
- फटाक्यांचा मर्यादित प्रमाणात वापर करा.
- फटाके वाजत असताना श्रवणयंत्र काढून ठेवा.
- श्रवणयंत्राचा वापर करा आयष्य भरभरून जगण्याकरीता.